मुख्य रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:32+5:302020-12-31T04:29:32+5:30
कनेरगाव येथे नाल्यांचे पाणी रस्त्यावर कनेरगाव नाका : येथील काही वॉर्डातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ केल्या नाहीत. त्यामुळे पाणी ...
कनेरगाव येथे नाल्यांचे पाणी रस्त्यावर
कनेरगाव नाका : येथील काही वॉर्डातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ केल्या नाहीत. त्यामुळे पाणी रस्त्यांवर येवून डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देवून नाल्या स्वच्छ करणे गरजेचे आहे.
रस्त्यावर खड्डे ; वाहनचालक त्रस्त
कळमनुरी : कळमनुरी ते नांदेड या मु्ख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. संबंधित विभागाने वेळीच याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
कहाकर बु. येथील रस्ते दुरुस्तची मागणी
कहाकर बु. : सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथील अंतर्गत रस्त्यांची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. येथील मुख्य रस्ता वर्षभरापूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. परंतु, वर्षभरातच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले अहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अंतर्गत रस्त्यांसोबतच मुख्य रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव सुरुच
नर्सी नामदेव : नर्सीसह परिसरातील अनेक गावांत मागील पंधरा दिसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी या बाबीची दखल घेऊन गावासह परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नांदेड नाक्यावर खड्डेच खड्डे ; प्रवाशांची गैरसोय
हिंगोली: शहरातील नांदेड नाका येथे मागील काही दिवसांपासून खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून नांदेड नाका रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे.
‘डिग्रस कऱ्हाळे फाट्यावर गतिरोधक बसवा’
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाट्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या ठिकाणावरुन वाहने वेगाने जात आहेत; परंतु, कुठेही गतिरोधक बसविण्यात आले नाही. तेव्हा सा. बां. विभागाने याची दखल घेऊन डिग्रस फाट्यावर गतिरोधक बसवावे, अशीे मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.