प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आता कोरोनासाठी १० ऑक्सिजन बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:16+5:302021-04-23T04:32:16+5:30
चार ठिकाणी आधीच कोरोना रुग्ण ठेवण्याची तयारी झाली. उरलेल्या २० ठिकाणी प्रत्येकी दहा ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येईल. यासाठी ...
चार ठिकाणी आधीच कोरोना रुग्ण ठेवण्याची तयारी झाली. उरलेल्या २० ठिकाणी प्रत्येकी दहा ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येईल. यासाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन मागविण्यात येतील. एका मशीनवर एका रुग्णाला ऑक्सिजन मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे २०० मशीन लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक ठिकाणी तीन ते चार मशीन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे काही ठरावीक यंत्रणांवरच पडणारा ताणही कमी होईल.
ही सर्व यंत्रणा चालविण्यासाठी मनुष्यबळ कुठून आणणार? याबाबत विचारले असता डॉ. पवार म्हणाले, सध्या काही शहरी केंद्रांवर ग्रामीणचे डॉक्टर काम करीत आहेत. शिवाय नवीन भरतीची जाहिरातही काढली आहे. भरतीच्या डॉक्टरांचा पुरवठा शहरी भागात करून ग्रामीणचे डॉक्टर पुन्हा परत घेतले जातील. शिवाय उपकेंद्रांना बीएएमएस डॉक्टर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या एमबीबीएस डॉक्टरांसोबत ते काम करतील. तर परिचारिकांची भरतीही केली जात आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
अँटिजेन तपासणीही होईल
या प्राथमिक आरोग्य केंद्रातच कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटिजेन चाचणी होईल. शिवाय शंका असल्यास आरटीपीसीआरचे स्रावही घेतले जातील. अनेकदा रुग्ण बराच वेळ वाया घालत असल्याने गंभीर होत आहेत. ते टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणी उपयुक्त ठरणार आहे.