रानभाज्या खा अन् निरोगी राहा....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:47+5:302021-08-12T04:33:47+5:30

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का? आघाडा शरीरातील अनेक दुर्धर व्याधींचे हरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आघाडा ...

Eat legumes and stay healthy ....! | रानभाज्या खा अन् निरोगी राहा....!

रानभाज्या खा अन् निरोगी राहा....!

Next

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

आघाडा

शरीरातील अनेक दुर्धर व्याधींचे हरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आघाडा भाजी आहे.

तांदुळजा

सदरील भाजी ही शेतातील धुऱ्याशेजारी उगवली जाते. ही भाजी गुणकारी असून चवदारही आहे.

शेवगा

शेवगा हा उपयुक्त असून डोळ्याचा व इतर आजार दूर करणारा आहे. शेवग्यास आयुर्वेदिक महत्त्व आहे.

चवळाई

धुऱ्याच्या बाजूला सदरील भाजी उगवते. ही भाजी गुणकारी असून चवदारपणा देते.

हडसन

ही भाजी केवळ पावसाळ्यात उपलब्ध होते. हाडांना मजबूत करण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते.

या रानभाज्या झाल्या गायब...

कडवंचे

ही फळवगर्गीय भाजी आहे. ही भाजी सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणीच सापडते. इतर जिल्ह्यात ही भाजी आढळत नाही.

खडकशेपू

खडकशेपू ही भाजी केवळ खडकाळ भागातच मिळते; परंतु हल्ली भाजी कुठेही पाहायला मिळत नाही. आयुर्वेदात महत्त्व सांगितले जाते.

शक्तिवर्धक रानभाज्या

रानभाजी कोणतीही असो ती शक्तिवर्धकच अशी असते; परंतु हल्ली पिझा, बर्गर आदी चमचमीत पदार्थांकडे कल वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे रानभाज्या मंडईत आल्या तरी त्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही. रानभाज्या खाल्ल्यास कोणतीही व्याधी होत नाही.

- डाॅ. गोपाल कदम, आहारतज्ज्ञ

Web Title: Eat legumes and stay healthy ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.