पुन्हा वाढली आंदोलनांची धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:12 AM2019-08-27T01:12:00+5:302019-08-27T01:12:16+5:30
प्रलंबित मागण्यांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. निवेदने देऊनही काही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही करावी, यासाठी २६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर नागरिकांनी उपोषण व आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण व आंदोलनाने दुमदुमले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रलंबित मागण्यांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. निवेदने देऊनही काही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही करावी, यासाठी २६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर नागरिकांनी उपोषण व आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण व आंदोलनाने दुमदुमले होते.
प्रशासन दरबारी आंदोलकांची हिंगोली शहरात सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती. विविध मागण्यांचे निवेदनही त्यांनी यापूर्वीच दिले होते. परंतु निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे यासाठी उपोषण व आंदोलन करण्यात आले.
पैशासाठी विवाहितेचा छळ; पण गुन्हा दाखल नाही
पाच लाख रूपये माहेराहून घेऊन ये, तसेच कार घेण्यासाठी पैसे घेऊन येण्याचा सासरच्या मंडळींनी गर्भवती विवाहिता गायत्री माधव खंदारे हिस तगादा लावला होता. याच कारणातून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिच्या पोटात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण केल्याने विवाहिता गायत्री खंदारे व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. परंतु या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मयत विवाहितेचा पती व सासरच्या मंडळीविरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच कार्यरत पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत मयत महिलेच्या नातेवाईकांनी २६ आॅगस्टपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणातील दोषींवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, याबाबत गंगाराम नारायण कापसे (रा. भानखेडा. ता सेनगाव) यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. उपोषणास गंगाराम कापसे, आबाजी कापसे, भगवान कापसे, पांडुरंग कापसे, भागवत कापसे, सुमनबाई कोटकर, अलका कोटकर, दुर्गा कापसे यांच्यासह जवळपास ५० महिला व पुरूष उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा मयत महिलेचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला आहे.
शेतकरी संघटनेतर्फे कार्यालयासमोर उपोषण
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाºयांच्या ताब्यातील हॉल शेतकºयांसाठी खुला करुन देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबधंक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरु आहे. शेतकºयांच्या शेतमालाच्या बीटसाठी देण्यात आलेला हॉल बाजार समितीने व्यापाºयांना दिला आहे. त्यामुळे शेतकºयांना शेतमाल उघड्यावर ठेवावा लागत आहे. बाजार समिती शेतकºयांच्या हितासाठी काम न करता व्यापाºयांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील शेतकºयांनी यासंबंधी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. संचालक मंडळी या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे. सचिवही उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. त्यामुळे येथील शेतकºयांनी २६ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. जिल्हा उपनिबंधक मैत्रेवार रजेवर असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषणकर्त्यांची आधिकाºयांनी साधी भेटही घेतली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. यावेळी बापूराव गरड, सुभाष गाडगे, ऋषिकेश बर्वे, रामेश्वर बोंढारे, ज्ञानेश्वर बोंढारे, नारायन कदम हे उपोषणकर्ते उपस्थित होते.
शाळा बंद ठेवून आंदोलनात शिक्षक संघटना सहभागी
विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. २६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित शाळा बंद ठेवून मुंबई व लातूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून सहभाग नोंदविला. विनाअनुदानित शाळेतील शेकडो शिक्षक व शिक्षिका आंदोलनात सहभागी होण्यासाठी लातूर येथे सोमवारी रवाना झाले आहेत. सर्व शिक्षक संघटनांनी मिळून माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना निवेदन सादर केले. शासनाने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमवारी जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन उपोषण सुरू केल्याने प्रशासन दरबारी कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसून आला.