हिंगोलीत खाद्यतेलाचे भाव वाढले, डाळींमध्ये स्थिरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:59+5:302021-01-17T04:25:59+5:30
हिंगोली : शहरातील मंडईमध्ये भाजीपाल्याची आवक जास्त असल्यामुळे भाजीपाला स्वस्त मिळत असला तरी खाद्यतेलाचे भाव मात्र वाढलेले पहायला मिळत ...
हिंगोली : शहरातील मंडईमध्ये भाजीपाल्याची आवक जास्त असल्यामुळे भाजीपाला स्वस्त मिळत असला तरी खाद्यतेलाचे भाव मात्र वाढलेले पहायला मिळत आहेत.
यावर्षी पाण्याची मुबलकता असल्यामुळे भाजी उत्पादकांनी भाजीपाल्याचे उत्पादन जास्त घेतले. त्यामुळे सद्य:स्थितीत भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंद पसरला आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत शनिवारी तूरडाळ ११० रुपये किलो, हरभरा डाळ ६० रुपये किलो, मसूर डाळ ५५ रुपये किलो, मूगडाळ ११० रुपये किलो, उडीद डाळ ११० रुपये किलो दराने विक्री झाली. आठ दिवसांपूर्वी तांदूळ १४२ रुपये किलो होता. तो १४८ रुपये किलोने विक्री होत आहे. गुळाचा भाव आठ दिवसांपूर्वी ५० रुपये किलो होता. आजमितीस ३५ रुपये किलोने विकला जात असून साखर ३७ रुपये किलोवरून ३४ रुपये किलोने विक्री होत आहे.
खाद्यतेलाचे भाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सोयाबीन पंधरा दिवसांपूर्वी ११० रुपये किलो होते ते आज १२० रुपये किलोने विक्री होत आहे. सूर्यफूल ११५ रुपये किलोवरून १२५ रुपये तर शेंगदाणा तेल १३० रुपये किलोवरूल १४० रुपये किलोने विक्री होत आहे.