वसमत येथे आठ जुगारी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:40 PM2017-12-02T23:40:12+5:302017-12-02T23:40:17+5:30
वसमत रेल्वे स्टेशनच्या मागे शेतात जुगार खेळणाºया आठ जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून १ लाख ३८ हजार ३३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. हिंगोली पोलिसांचे विशेष पथक व वसमत शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील गिरगाव येथेही जुगार जोरात चालत असून तेथे आता कारवाई कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
वसमत : वसमत रेल्वे स्टेशनच्या मागे शेतात जुगार खेळणाºया आठ जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून १ लाख ३८ हजार ३३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. हिंगोली पोलिसांचे विशेष पथक व वसमत शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तालुक्यातील गिरगाव येथेही जुगार जोरात चालत असून तेथे आता कारवाई कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
वसमत रेल्वेस्टेशनच्या पाठीमागच्या शेतात जुगारी जुगाराचा डाव रंगवत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी सपोनि गुलाब बाचेवाड व त्यांच्या पथकातील कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या पथकाने छापा मारला. या छाप्यात २३ हजार रुपये नगदी आठ मोबाईल, तीन दुचाकी असा १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या छाप्यात मन्नुसिंग चव्हाण, अशोक बगाटे, गोपाळ देवरे, तुकाराम गव्हाणे, भगवान क्षीरसागर, बालाजी चव्हाण, शिवराज एरंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाचा तपास पोनि उदयसिंह चंदेल करत आहेत.
गिरगावचा नंबर कधी
गिरगाव येथे जुगार अड्डा चालत असून तेथे नांदेड, मालेगाव, अर्धापूर परिसरातून जुगारी वाहनांद्वारे हजेरी लावत आहेत. लपून छपून नाही तर खुलेआम चालणाºया या जुगार अड्ड्यावर पोलिसांची नजर नाही. आमदारांच्या उपोषणानंतरही हा जुगार सुरूच असल्याने आता येथील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.