अंथरूणाला खिळून असणाऱ्या वयोवृद्ध लाभार्थींना मिळणार घरपोच लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:58+5:302021-08-17T04:34:58+5:30

शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र हयातनगर येथे अंथरूणावर खिळून असणाऱ्या वयोवृद्ध रुग्णास आरोग्यसेविका मीरा माने यांनी लस दिली. ...

Elderly beneficiaries who are bedridden will receive the home vaccine | अंथरूणाला खिळून असणाऱ्या वयोवृद्ध लाभार्थींना मिळणार घरपोच लस

अंथरूणाला खिळून असणाऱ्या वयोवृद्ध लाभार्थींना मिळणार घरपोच लस

Next

शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र हयातनगर येथे अंथरूणावर खिळून असणाऱ्या वयोवृद्ध रुग्णास आरोग्यसेविका मीरा माने यांनी लस दिली. यावेळी आरोग्य साहाय्यिका प्रेमा शिंदे व इतर आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. जिल्ह्यात कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत जे रुग्ण अंथरूणाला खिळून आहेत, जे रुग्ण रुग्णालयात येऊ शकत नाहीत, अशा रुग्णांना आरोग्य विभागामार्फत घरोघर लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये असे रग्ण असल्यास त्यांच्या नातेवाइकांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व त्या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात माहिती द्यावी म्हणजे अशा सर्व रुग्णांचे कोरोना लसीकरण करण्यात येईल, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले.

लसीकरणाबाबत सर्वांना सूचना...

जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांना नियमित भेटी देऊन लसीकरण वेळेवर व व्यवस्थितरीत्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व अधिकारी राष्ट्रीय कार्यक्रमाच्या कामाची पाहणी करत आहेत. याकामी आरोग्य कर्मचारी वर्गांना सुधारणा करण्याबाबत सूचना देत आहेत. लसीकरण व कोविड लसीकरण जास्तीत जास्त करावे व नियमित लसीकरण वेळेवर करावे.

- डॉ. कैलास शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी

फोटो ५

_________

Web Title: Elderly beneficiaries who are bedridden will receive the home vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.