औंढा नागनाथ तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:32 AM2021-02-09T04:32:51+5:302021-02-09T04:32:51+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३० ग्रामपंचायतींचा सरपंच, ...
औंढा नागनाथ : तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३० ग्रामपंचायतींचा सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्या अनुषंगाने ८ फेब्रुवारी रोजी ज्या - त्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. परंतु ३० पैकी ८ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित जागेमधून एकही सदस्य निवडून न आल्याने या ठिकाणचे सरपंचपद रिक्त आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात तीन टप्प्यांमध्ये सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तीस ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये आजरसोंडा सरपंच बेबी अनिल गायकवाड, उपसरपंच अर्चना राधाकिशन राखुंडे, अंजनवाडा सरपंच यशोदाबाई वामन घोंगडे, उपसरपंचपदी उत्तम थावरा चव्हाण, जामगव्हाण सरपंच परमेश्वर भागोराव मुकाडे, उपसरपंच राहुल भीमाशंकर क्यातमवार, अंजनवाडी येथे सरपंच जयराम कुटे , उपसरपंच म्हणून करून आनंद घनसावंत, अनखळी सरपंच सोनाबाई भाऊराव गारकर, तर उपसरपंच त्रिवेणी श्रीराम जायभाय, असोंदा माळगाव सरपंच जयश्री साहेबराव शिंदे, उपसरपंच मीराबाई शिंदे, असोला तर्फे लाख सरपंच सुनीता अशोक कऱ्हाळे, उपसरपंच त्रिशलाबाई गणेश कऱ्हाळे, जवळा बाजार सरपंच स्वाती दत्ता अंभोरे, उपसरपंच सय्यद अंजुम सय्यद फारुख, दुघाळा सरपंच मथुरा राजू पवार, उपसरपंच प्रयागबाई आगासे, धार येथे सरपंच वर्षा रनमाळ, उपसरपंच पूजा रावळ, जलालपूर सरपंच संताबाई बापूराव उदास, उपसरपंच अंबादास किसन मोरगे, मार्डी सरपंच अनिता यादव सरोदे, उपसरपंच रेणुकाबाई मनेवार, मेथा सरपंच सारिका किशन विकास अनेकर, उपसरपंच पिराजी लोंढे, सुरवाडी सरपंच द्वारकाबाई गुलाब पारेकर, उपसरपंच गयाबाई मुंजाजी टोम्पे, नांदगाव सरपंच छाया परमेश्वर पांढरे, उपसरपंच अनुसया शंकर जाधव, नागझरी सरपंच संगीता संजय गरपाळ, उपसरपंच शेख रेहाना गुलाब, पूर सरपंच सुशीला गणेशराव वानखेडे, उपसरपंच सोनूबाई मारुती काळे, सेंदुरसना सरपंच त्रिवेणाबाई रामराव देवकते, उपसरपंच अंजली गंगाधर ढेंबरे, सुरेगाव सरपंच शीला माधव पोले, उपसरपंच नीताबाई गजानन दिंडे, शिरला सरपंच सुमित्रा नवनाथ कुरे, उपसरपंच कोंडूबाई देविदास गोमासे, सिद्धेश्वर सरपंच डॉ. प्रल्हाद कचरू वाघमारे, उपसरपंच कावेरा आत्माराम चौधरी, या २२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदी अध्यासी अधिकाऱ्यांनी निवड प्रक्रिया घेऊन निवड केली.
तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे सरपंच पदासाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सदस्य नसल्याने उपसरपंच भुजंग सोळंके यांची निवड करण्यात आली. सरपंच पद रद्द करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुरजळ येथे सरपंच पद रिक्त आहे, तर उपसरपंचपदी बेबीताई डुकरे यांची निवड केली आहे. याप्रमाणे पुढील काही गावांतील उपसरपंचपदी निवड करण्यात आली. नांदखेडा येथे उपसरपंच जनार्दन कदम, मालेगाव उपसरपंच प्रल्हाद आहेर, जोडपिंपरी उपसरपंच पदी सर्जेराव ठोंबरे, आसोला तर्फे औंढा नागनाथ उपसरपंचपदी गजानन ढोबळे, जळगाव उपसरपंच पदी सुनंदा संजय पडोळे, आमदरी येथे संतोष नामदेव डुकरे यांची उपसरपंच पदी वर्णी लागली आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी विशिष्ट प्रवर्गात एकही उमेदवार निवडून आला नाही. त्या गावात एकही त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने या ठिकाणचे सरपंचपद रिक्त राहिले आहे, अशी माहिती तहसीलदार डाॅ. कृष्णा कानगुले यांनी दिली.