चार तासांतच विद्युत रोहित्र केले दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:38+5:302021-06-30T04:19:38+5:30

२७ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रिसाला चौक येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे वीज रोहित्रावर असलेल्या ...

Electrical Rohitra was repaired within four hours | चार तासांतच विद्युत रोहित्र केले दुरुस्त

चार तासांतच विद्युत रोहित्र केले दुरुस्त

Next

२७ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रिसाला चौक येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे वीज रोहित्रावर असलेल्या ४० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, काही वीज ग्राहकांनी महावितरणला याची माहिती देऊन वीज रोहित्र बसविण्याबाबत सांगितले. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे, सहायक अभियंता सरोज चंदनखेडे यांनी पाच लाइनमनला दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान रिसाला चौक भागात पाठविले. लाइनमनने नादुरुस्त विद्युत रोहित्र बाजूला काढून ठेवले व नवीन आणलेले रोहित्र बसविले, परंतु तेही चालू होण्याच्या स्थितीत दिसत नव्हते. लगेच लाइनमनने दुसरे वीज रोहित्र आणले व रात्री नऊ वाजता रिसाला चौक भागातील नागरिकांचा वीजपुरवठा सुरू करून दिला. वीज रोहित्र सुरू करण्यासाठी दीपक गडदे, गजानन चव्हाण, भागवत शिंदे, नागेश हुडदुखे, दशरथ कदम यांनी मोलाची कामगिरी केली.

फोटो ५

Web Title: Electrical Rohitra was repaired within four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.