अकोला-पूर्णा मार्गाचे विद्युतीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:32 PM2018-09-28T23:32:25+5:302018-09-28T23:32:53+5:30
पूर्णा-अकोला २०९ किमी रेल्वे मार्गावर लवकरच विद्युतीकरण होणार असून, या कामाला येत्या तीन महिन्यांत प्रारंभ होणार असल्याची माहिती हिंगोलीचे खा.राजीव सातव यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पूर्णा-अकोला २०९ किमी रेल्वे मार्गावर लवकरच विद्युतीकरण होणार असून, या कामाला येत्या तीन महिन्यांत प्रारंभ होणार असल्याची माहिती हिंगोलीचे खा.राजीव सातव यांनी दिली.
नांदेड येथे रेल्वे विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, औरंगाबादचे खा.चंद्रकांत खैरे, परभणीचे खा.बंडु जाधव, हिंगोलीचे खा.राजीव सातव, अकोल्याचे खा.संजय धोत्रे, रेल्वे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांची उपस्थिती होती. या बैठकीत पूर्णा-अकोला रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासंदर्भात सातव यांनी विचारणा केली होती. येत्या तीन महिन्यात या मार्गावर २११ कोटी ५८ लाख खर्च करून विद्युतीकरण कामास प्रारंभ होणार असल्याचे महाप्रबंधकांनी सांगीतले. हिंगोली व गोकुंदा येथील ओव्हरब्रिजच्या कामासंदर्भात केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, राज्य सरकारकडे हा प्रश्न प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोलीत रेल्वे स्थानक परिसरात मोकळ्या जागेत व्यापारी संकुल, उद्यान, खेळाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात खा.सातव यांनी रेल्वे महाप्रबंधकाकडे मागणी केली असता यासंदर्भात आपण येत्या नोव्हेंबर महिन्यात हिंगोली दौऱ्यावर येणार असून, यावेळी संबंधित जागेची पाहणी करणार असल्याचे सांगितले. हिंगोली रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे व मूलभूत सुविधा लवकरच पुरविण्याचे आश्वासने दिले आहे.
अजनी-नागपूर-कुर्ला व्हाया हिंगोली या रेल्वेच्या फेºया वाढवाव्यात, नांदेड-अकोला-वाराणसीमार्गे बुद्धगया, हैदराबाद-नांदेड-अकोलामार्गे इलाहाबाद-लखनौ नवाब एक्सप्रेस, काश्मीर वैष्णोदेवी अमरनाथ यात्रेसाठी नांदेड-कटरा रेल्वेगाडी, नांदेड-शेगाव संत गजानन एक्सप्रेस, नांदेड-अकोला-पटना एक्सप्रेस, इसार-रामेश्वरम, व्हाया-अकोला-हिंगोली नांदेड-धनबाद, व्हाया-पुर्णा-अकोला, आदिलाबाद येथुन मुंबई सवारी गाडी, नांदेड-औरंगाबाद, व्हाया-अकोला-हिंगोली-पूर्णा, नांदेड-वाराणसी व चार धाम यात्रेसाठी रेल्वेगाड्या सुरु कराव्यात, तसेच वसमत रेल्वेस्थानकावरून जाणाºया अतिजलद रेल्वेस थांबा देण्यात यावा. तपोवन एक्सप्रेसला अदिलाबादपर्यंत विस्तारीत करावेत आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खा.सातव यांनी केली.