"मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 05:07 PM2022-10-09T17:07:52+5:302022-10-09T17:22:29+5:30

एका शेतकऱ्याच्या इयत्ता सहावीतील मुलाने यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे.

emotional letter from farmer's son to the Chief Minister Eknath Shinde over diwali | "मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

"मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

Next

दिलीप कावरखे

गोरेगाव (जि. हिंगोली) - दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, असे भावनिक पत्र शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

एका शेतकऱ्याच्या इयत्ता सहावीतील मुलाने यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

शासनाने शेतकऱ्यांना सुखी ठेवावे... गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सणाला पोळ्या तर सोडा साधे गुपचूपसाठी पण पैसे सध्या नाहीत. जवळच्या जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे फाशी घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवावे आणि अनुदान लवकर द्यावे, असेही पत्रात नमूद केले आहे.

Web Title: emotional letter from farmer's son to the Chief Minister Eknath Shinde over diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.