रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:01+5:302021-01-17T04:26:01+5:30

बोअर व विहिरीचे पाणी आटू लागले बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील अनेक बोेअर व विहिरीतील पाणी आटत आहे. ...

Empire of dust on the streets | रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

googlenewsNext

बोअर व विहिरीचे पाणी आटू लागले

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील अनेक बोेअर व विहिरीतील पाणी आटत आहे. तसेच अनेक भागांत पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन संक्रांतीच्या दिवसात गावकरी पाण्यासाठी इतरत्र भटकत असल्याचे पाहायला मिळाले.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगावात जागोजागी कचरा व घाण पसरली आहे. यामध्ये गावातील बसस्थानक, जि.प. प्रशाला, आरोग्य केंद्र परिसरामध्ये कचरा व घाण नालीचे पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे रेल्वेस्थानकपासून ते गावापर्यंत असलेल्या एक किमी अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील दीड वर्षापासून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे गावातील वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागत आहे.

बससेवा सुरू करण्याची मागणी

पांगरा शिंदे : मागील २० वर्षांपासून सुरू असलेली कळमनुरी आगारातील बससेवा बंद झाल्याने पांगरा शिंदेसह परिसरातील गावकऱ्यांंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महामंडळची बससेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहनचालक प्रवाशांकडून जास्त पैसे उकळत आहेत. तेव्हा बससेवा सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Web Title: Empire of dust on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.