झाडेझुडपांसह केरकचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:42+5:302021-02-17T04:35:42+5:30
हळद पिकावर करपा कळमनुरी : तालुक्यात यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात हळद पिकाची लागवड केली आहे. अनेकांच्या शेतात पीक बहरले ...
हळद पिकावर करपा
कळमनुरी : तालुक्यात यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात हळद पिकाची लागवड केली आहे. अनेकांच्या शेतात पीक बहरले असून अचानक या पिकाचे पाने वाळून पिवळी पडून करपत आहेत. पिकावर आलेल्या करपा रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला असून हळद पिकावरील या रोगाच्या नियत्रंणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
गहुचे पीक पसरले
कळमनुरी : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी थंड वारे सुटत आहे. सदरिल वारे जोरदार वेगाने सुटत असल्यामुळे कळमनुरी तालुक्यातील अनेक शेतशिवारात बहरलेले गव्हाचे पीक खाली पसरले आहे. गव्हाचे पीक पसरल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. या प्रकरामुळे गव्हाच्या पिकात घट होते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित
हिंगोली : शहरातील वीजपुरवठा सोमवार या दिवशी दिवस - रात्र वारंवार खंडित झाला. वीजेच्या अप लपंडावामुळे शहरातील अनेक नगरवासियांचे वीजउकरणे जळाली आहेत. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हातपंप दुरुस्त करण्याची मागणी
औंढा नागनाथ : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून अनेक नागरिक वाढत्या उन्हाच्या तिव्रेतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीही होताना दिसून येत आहे. नादुरुस्त हातपंपाची दुरूस्ती करावूी, अशी मागणी होत आहे.
मजुरांचे स्थलांतर वाढले
औंढा नागनाथ : हाताला काम मिळावे यासाठी अनेक मजुरवर्ग कामाच्या शोधात पर जिल्ह्यात जात आहेत. तालुक्यात मजुरांसाठी कामे सुरु करावीत,अशी मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात मोठे वनविभागाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक वन्य प्राणी आहेत. सध्या या भागातील जलस्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. हरीण, ससे, कोल्हे, निलगाय आदी प्राणी पाण्याच्या शोधात गावकुसात येत आहेत.
रामेश्वर तांडा - वारंगा रस्त्याची दुरवस्था
रामेश्वर तांडा - कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा - वारंगा फाटा या मुख्य रस्त्याची दुरवस्था मागील दोन वर्षभरापासून झालेली आहे. परत या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
उड्डाणपुलाचे काम संथगतीने
हिंगोली : शहरातील खटकाळी रस्त्यावर होणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने होत आहे. यामुळे पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून मागील वर्षभरापासून वाहनधारक व नागरिकांना याठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. रस्ता उखडला असल्यामुळे याठिकाणी धुळीचे प्रमाण वाढले आहे.