कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:33 AM2018-04-20T00:33:46+5:302018-04-20T00:33:46+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचा-यांच्या मूल्यांकनासाठी तयार केलेल्या एचआर परफॉर्मंस इंडिकेटर्सच्या विरोधात ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले. १९ एप्रिल रोजी आंदोलनाचा नववा दिवस होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाºयांच्या मूल्यांकनासाठी तयार केलेल्या एचआर परफॉर्मंस इंडिकेटर्सच्या विरोधात ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले. १९ एप्रिल रोजी आंदोलनाचा नववा दिवस होता. अनेकांनी आंदोलकांची भेट घेतली. कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे मात्र आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. गुरूवारी कर्मचाºयांच्या मागण्या पुर्ततेसाठी हिंगोली येथून आ. जयप्रकाश मुंदडा यांच्यासमवेत शिष्टमंडळ औरंगाबाद येथे रवाना झाले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे आता पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.