३१ पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:37+5:302021-08-22T04:32:37+5:30

जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलकडे दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर पांदण, शेत व शिवार रस्त्यांच्या अनेक तक्रारी येतात. पूर्वीप्रमाणे असलेले नकाशावरील हे ...

Encroachment on 31 paved roads was stopped | ३१ पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटले

३१ पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटले

Next

जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलकडे दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर पांदण, शेत व शिवार रस्त्यांच्या अनेक तक्रारी येतात. पूर्वीप्रमाणे असलेले नकाशावरील हे रस्ते मोकळे करून देण्याची मागणी करण्यात येते. मात्र, अनेकांच्या या तक्रारींकडे तहसील प्रशासन लक्षच देत नाही. गावपातळीवर यामुळे कायम वाद धुमसत राहतात. या वादातून अनेकदा हाणामाऱ्याही होतात. पोलीस ठाण्यात दाखल तक्रारींपैकी ३० ते ४० टक्के तक्रारी या शेतातील रस्त्याच्या कारणावरूनच असतात. त्यामुळे पांदण, शेत व शिवार रस्ते मोकळे होणे गरजेचे आहे. मात्र, केवळ शासकीय अहवालापुरतेच महसूल यंत्रणा काम करते, ही वस्तुस्थिती आहे.

हिंगोली जिल्ह्यात ३१ जुलै २०२० मध्ये कळमनुरीत ३१ तर औंढ्यात १ रस्ता अतिक्रमित असल्याचे म्हटले आहे. या रस्त्यांची लांबी ४४.५७ किलोमीटर आहे. तर जून २०२१ पूर्वी हिंगोलीत २८ किलोमीटरचे ११, सेनगावात १६.५ किलोमीटरचे १२ तर वसमतला २.६ किलोमीटरचे २ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. तर चालू महिन्यात हिंगोलीत २ किलोमीटरचे ४ व औंढ्यात २ किलोमीटरचे दोन रस्ते अतिक्रमणमुक्त केले. एकूण ५१.१ किलोमीटरचे ३१ रस्ते अतिक्रमणमुक्त केले आहेत.

Web Title: Encroachment on 31 paved roads was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.