२१ फेब्रुवारीनंतर ‘जलेश्वर’वरील अतिक्रमणे हटणार; विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:49 PM2020-02-18T17:49:43+5:302020-02-18T17:53:12+5:30

अतिक्रमणावर थेट कारवाई होणार 

The encroachment on 'Jaleshwar' will be removed after February 21 | २१ फेब्रुवारीनंतर ‘जलेश्वर’वरील अतिक्रमणे हटणार; विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

२१ फेब्रुवारीनंतर ‘जलेश्वर’वरील अतिक्रमणे हटणार; विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देभूमिअभिलेख कार्यालयाने केले रेखांकन विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला अधिक गती आली असून महसूल प्रशासनाने थेट कारवाईच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत. त्यामुळे २१ फेब्रुवारीनंतर येथील अतिक्रमण कोणतीही पूर्वसूचना न देता हटविण्यात येणार आहे. 

जलेश्वर तलावाकाठावरील १९५ अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसीद्वारे कळविले होते; परंतु संबंधित अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे हिंगोली शहरातील जलेश्वर तलावासमोरील सर्व्हे नं. ०३ मधील अतिक्रमण भागाचे १५ फेब्रुवारी रोजी तालुका निरीक्षक भूमिअभिलेख यांच्यामार्फत रेखांकित करण्यात आले. तसेच अतिक्रमणधारकांना पुन्हा रीतसर नोटिसांद्वारे अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचनाही दिल्या. त्यामुळे आता २१ फेब्रुवारीनंतर सदरील अतिक्रमण केव्हाही व कोणतीही पूर्वसूचना न देता महसूल प्रशासनाच्या वतीने काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमणासाठी प्रशासनाने केलेला सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे यापूर्वीच अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, या ठिकाणच्या अतिक्रमणधारकांना मागील वर्षभरापासून प्रशासन वारंवार सूचना देत आहे. यासाठी अतिक्रमणाधारकही निवेदने देताना आढळत होते. मात्र अतिक्रमणे काही हटली नाहीत. त्यामुळे इतरांनीही तलावात गाळ टाकून अतिक्रमण करण्याचा सपाटा चालविला होता. आता या सर्व बाबींना चाप बसणार आहे. नुकत्याच झालेल्या एका अतिक्रमणानंतर या कारवाईला वेग आला होता. या अतिक्रमणात या तलावाचे आऊटलेटही बुजले आहे. त्यामुळे या तलावाचे हाल जास्त प्रमाणात झाले. तलावातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडलेच नाही. शिवाय शहरातही पाणी येण्याचे मार्ग अनेक ठिकाणी बंद झाले आहेत.

मंदिर संस्थान धर्मदाय आयुक्तांची परवानगी आवश्यक
श्री जलेश्वर संस्थनच्या सर्व विश्वस्त समिती सदस्यांनी दोन एकर जमिन अधिग्रहण करण्यास सहमती दर्शवली आहे. परंतु सदर बाबीकरीता संस्थानला महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट अधिनियमचे कलम ३६ अन्वये धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून भुसंपादन कायद्यान्वये मोबदलाची रक्कम कळविणे बाबत माहिती मागविली आहे. जेणेकरून हस्तांतरणासाठीचा अवरोध दूर करण्यासाठी मदत होईल. श्री जलेश्वर संस्थान हिगोली नोंदणी क्र. ए- ६०६ या संस्थानची मालकी व ताब्यामध्ये मौजे मल्हारवाडी येथील जमिन गट क्र. २१ व २२ ही जमिन आहे. शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर जलेश्वर तलाव शुशोभिकरण व तेथील अतिक्रमण काढून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. न. प. मुख्याधिकारी यांनी जलेश्वर संस्थान यांना पत्राद्वारे श्री जलेश्वर संस्थानची उपरोक्त मल्हारवाडी येथील एकूण जमिनीपैकी २.५ एकर जमीन पूनर्वसन कामासाठी मागणी केली. संस्थानचे विश्वस्तांनी वरिल बाबीवर चर्चा करून मुख्याधिकाऱ्यांना जवाबपत्र दिले आहे.

Web Title: The encroachment on 'Jaleshwar' will be removed after February 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.