रस्त्यावर असलेले अतिक्रमण स्वत:हून काढावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:35 AM2021-07-14T04:35:03+5:302021-07-14T04:35:03+5:30

हिंगोली : ज्या नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नसता नगर परिषदेच्या वतीने कारवाई केली ...

Encroachments on the road should be removed by yourself | रस्त्यावर असलेले अतिक्रमण स्वत:हून काढावे

रस्त्यावर असलेले अतिक्रमण स्वत:हून काढावे

Next

हिंगोली : ज्या नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, नसता नगर परिषदेच्या वतीने कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिला आहे.

१३ जुलै रोजी शहरातील रस्ते विकास प्रकल्पअंतर्गत चालू असलेल्या गोदावरी हॉटेल ते मंगळवार बाजारात जाणाऱ्या रस्त्याची मोजणीसीट नगर परिषदेने करून घेतली आहे. या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढून घेण्याची कारवाई पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, स्थापत्य अभियंता रविराज दरक, किशोर काकडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर उपस्थित होते.

रस्त्यात येणारे अतिक्रमण काढण्याकरिता संबंधितांच्या घरावर १७ जुलै रोजी मार्किंग टाकण्यात येणार आहे. मार्किंगप्रमाणे संबंधितांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण स्वत:हून काढणे गरजेचे आहे. नसता जेसीबीद्वारे ते काढले जाईल, असे मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी सांगितले. यावेळी नगर अभियंता

Web Title: Encroachments on the road should be removed by yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.