भूमिगत गटारावरील चेंबरची अभियंत्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:31 AM2021-07-30T04:31:59+5:302021-07-30T04:31:59+5:30
२९ जुलै रोजी कार्यकारी अभियंता पोत्रे यांनी शिवाजीनगर, अंबिका टॉकीज, रेल्वे स्टेशन, जवाहर रोड आदी भागात जाऊन चेंबर बरोबर ...
२९ जुलै रोजी कार्यकारी अभियंता पोत्रे यांनी शिवाजीनगर, अंबिका टॉकीज, रेल्वे स्टेशन, जवाहर रोड आदी भागात जाऊन चेंबर बरोबर बसविण्यात आले की नाही, याची पाहणी केली. घराघरातील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी ६८ कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटारे पूर्ण करण्यात आली आहेत. भूमिगत गटारे बसविण्याचे काम २९ नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू करण्यात आले होते. हे काम ३१ डिसेंबर २०२० मध्ये हे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी केलेल्या पाहणीदरम्यान, नगर परिषदेचे नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, अभियंता राजकुमार दिंडोरीकर, साइड व्यवस्थापक जगदीश पुरोहित आदींची उपस्थिती होती.
ड्रेनेजचे पाणी जोडण्याचे केले आवाहन...
भूमिगत गटार योजनेचे काम शहरात पूर्ण झाले आहे. अधिकाऱ्यांमार्फत सर्व चेंबरची पाहणी केली जात आहे. शहरातील नागरिकांनी नगर परिषदेला कळवून घरातील पाणी भूमिगत गटारास जोडावे. जेणेकरून भविष्यात कोणालाही ड्रेनेजच्या पाण्याचा त्रास होणार नाही. याबाबत काही अडचण आल्यास नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.