साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण

By रमेश वाबळे | Published: February 12, 2024 06:30 PM2024-02-12T18:30:08+5:302024-02-12T18:31:10+5:30

आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नसल्याचे अनुकंपाधारकांचे म्हणणे आहे.

Even though the age limit is over, the question does not go away; Fasting in Hingoli by sympathizers | साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण

साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण

हिंगोली : जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा अनुशेष तातडीने भरावा, शैक्षणिक अर्हतेनुसार तत्काळ शासन सेवेत सामावून घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी अनुकंपाधारकांनी १२ फेब्रुवारीपासून जि.प.कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

जिल्ह्यातील अनुकंपाधारक मागील अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असून, काहीजण वयोमर्यादेतून बाद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याकरिता अनुकंपाधारकांनी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली; परंतु आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नसल्याचे अनुकंपाधारकांचे म्हणणे आहे. सन २०२२ पासून जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे अनुकंपाधारक नोकरीपासून वंचित आहेत. या अनुकंपाधारकांना शैक्षणिक अर्हतेनुसार तत्काळ शासन सेवेत सामावून घ्यावे. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी तरतूद करावी, या मागणीसाठी जिल्हा अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे.

यासंदर्भात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. उपोषणात संदीप खंदारे, विठ्ठल साबळे, अनिकेत सोनटक्के, पुनित पट्टेबहादूर, संदीप कांबळे, जगदीश मोरे, ऋषिकेश कुंदर्गे, अविनाश कांबळे, संजय राठोड, अमोल चारठाणकर, सिद्धार्थ गायकवाड, शेख परवेज, निखिल बर्गे, अमोल गिरी, सचिन गव्हाणे, आशिष वाळके, अरुण भास्करे, वैभव देशमुख, राजू हनवते, श्रीकांत जगताप, ऋषिकेश गायकवाड, शासनजीत कदम आदींचा समावेश आहे.

Web Title: Even though the age limit is over, the question does not go away; Fasting in Hingoli by sympathizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.