माता रमाई यांचे जीवनचरित्र सर्वांनी आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:36 AM2021-02-17T04:36:09+5:302021-02-17T04:36:09+5:30

कळमनुरी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक यशात माता रमाईंचे मोठे योगदान आहे. त्यांचा जीवन त्याग, समर्पित भावनेने व तेवढेच ...

Everyone should assimilate the biography of Mata Ramai | माता रमाई यांचे जीवनचरित्र सर्वांनी आत्मसात करावे

माता रमाई यांचे जीवनचरित्र सर्वांनी आत्मसात करावे

Next

कळमनुरी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक यशात माता रमाईंचे मोठे योगदान आहे. त्यांचा जीवन त्याग, समर्पित भावनेने व तेवढेच भव्य विचाराने भरलेले असून त्यांचे जीवनचरित्र सर्वांनीच आत्मसात करावे, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. करुणा जमदाडे यांनी केले.

नागवंश सेवा संस्थेच्यावतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारीला व्याख्यान झाले. यानिमित्त ‘माता रमाई आंबेडकर यांचे जीवनचरित्रावर व्याख्यान केले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रकल्प अधिकारी ए. यु. धाबे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. यशवंत पाईकराव, प्रमुख पाहुणे जिल्हा जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपायुक्त डॉ. छाया कुलाल, प्राचार्य सदानंद लोखंडे, हास्यसम्राट शीलवंत वाढवे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन देवानंद गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक नागवंश सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप सावते यांनी केले. आभार विठ्ठल घोंगडे यांनी मानले. यशस्वितेसाठी पंजाब वाढवे पेंटर, कपिल चोपडे, मधुकर खंदारे, सुजाता वाढवे, वैशाली घोंगडे, चिरंजीव धवसे, गुरुदास खिल्लारे, संगीता पाटील आदींनी पुढाकार घेतला. फोटो नं. २२

Web Title: Everyone should assimilate the biography of Mata Ramai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.