‘गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने लक्ष द्यावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:15+5:302021-01-08T05:38:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेनगाव : गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे यांनी केले.
सेनगाव तालुक्यातील वेलतुरा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल दिनांक ५ जानेवारी रोजी आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नऊ सदस्यीय वेलतुरा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानिमित्ताने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ह. भ. प. सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या मार्गदर्शनानुसार आदर्श ग्रामपंचायत, पाटोदाचे सरपंच पेरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बिनविरोध निवडून आलेले सदस्य चंद्रभागा सानप, प्रीती सानप, किसन सोनुने, प्रकाश खरबळ, जयश्री खरबळ, सरस्वती खरबळ, संतोष सानप, द्वारकाबाई सानप, सुनीता खिल्लारे आदी उपस्थित होते. यावेळी भास्कर पेरे यांनी ग्रामविकासाचा मंत्र सांगत शासनाच्या विविध योजना प्रामाणिकपणे राबविण्याची गरज आहे. प्रत्येकाने गावाच्या विकासासाठी योगदान दिले तर निश्चितच प्रत्येक गाव आदर्श होईल, असे सांगितले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.