सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पहावी लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:55 AM2021-02-18T04:55:29+5:302021-02-18T04:55:29+5:30

जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या कोरोना लसीकरणाची गती जेमतेमच आहे. सध्याची लसीकरणाची ही गती अशीच कायम राहिल्यास शेवटच्या माणसाला पुढीलवर्षी ...

Everyone will have to wait a year to get the corona vaccine! | सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पहावी लागणार !

सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पहावी लागणार !

Next

जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या कोरोना लसीकरणाची गती जेमतेमच आहे. सध्याची लसीकरणाची ही गती अशीच कायम राहिल्यास शेवटच्या माणसाला पुढीलवर्षी याच महिन्यात लस मिळू शकते, असेच सध्याच्या गतीवरुन दिसून येते.

बॉक्स

दहा दिवसांत ६२ रुग्ण

जिल्ह्यात ७ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या १० दिवसांमध्ये ६२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. यापैकी ५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, १२ व १३ फेब्रुवारी या दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे नागरिक म्हणावी तेवढी काळजी घेत नाहीत, हे यावरुन दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मास्क घाला, सॅनिटायझरने हात धुवा, सामाजिक अंतर ठेवा अशा सूचनाही दिल्या जात आहेत. परंतु, नागरिक सुचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत.

जिल्ह्यासाठी ११ हजार कोरोना लस डोस उपलब्ध झालेली आहे. ही लस डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवकांना दिली जात आहे. लसीसंदर्भात गतीही वाढविली जाणार असून सर्वाना लस लवकरच दिली जाईल.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक

डोस उपलब्ध, मग गती का वाढत नाही

जिल्ह्यासाठी ११ हजार लसीचा डोस आला आहे. सर्वजण लसीचा डोसही घेत आहेत. मग गती का वाढत नाही, असा साधा प्रश्न समोर येऊ लागला आहे. कोरोना लस संदर्भात गती वाढविणे गरजेचे आहे.

१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील परिचारिका वसतिगृह, जिल्हा रुग्णालय लसीकरणाची संख्या ३६, दुसरा डोस १३, प्रगतीपथावरील लस संख्या १८५८, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी लसीकरणाची संख्या १, दुसरा डोस ३५, प्रगतीपथावरील लस संख्या ११३३, ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ प्रगतीपथावर ५६५, उपजिल्हा रुग्णालय वसमत प्रगतीपथावर ७८६, ग्रामीण रुग्णालय सेनगाव लसीकरणाची संख्या १२, प्रगतीपथावर ४११, प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव प्रगतीपथावर २१०, प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा प्रगतीपथावर १३२, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरडशहापूर, प्रगतीपथावर ४४ आहेत. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रावर एकूण ५ हजार १३९ प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Everyone will have to wait a year to get the corona vaccine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.