विनाकारण फिरणाऱ्यांच्या तपासणीत आढळले ५ पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:42+5:302021-04-26T04:26:42+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र तरीही काहीजण शहरातील अकोला बायपास रोड भागात विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने या भागात कोरोना ॲटीजेन तपासणी स्थापन करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्याची ॲटीजेन तपासणी केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशीही विनाकरण फिरणाऱ्या १०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच जण कोरोनाबाधित निघाले. यातील बाधितांना उपचारासाठी कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यासाठी सपोनि. बी.आर. बंदखडके, डॉ. शेख जावेद, डॉ. इम्रान अली, पोहेकॉ शेषराव पोले, गजानन पोकळे, अशोक धामणे, सुरेश रणखांब, सोपान सांगळे, दादाराव डूकरे, हौसाजी चिभडे, स्वाती कांबळे, प्रवीण भालेराव, ओम जाधव, होमगार्ड बाजाली केदार, हरिश्चंद्र घ्यार आदींनी पुढाकार घेतला.
फोटो 25hnlp21 कॅप्शन : हिंगोली येथील अकोला बायपास भागात विनाकारण फिरणाऱ्यांना तपासणी करण्यासाठी नेताना पोलीस.