स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 12:05 PM2022-10-02T12:05:09+5:302022-10-02T12:08:19+5:30

वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी स असलम स सरफराज (२०, रा बुखारी तकीया)  या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला

Excitement after body found naked in graveyard in hingoli | स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Next

वसमत ( हिंगोली) : शहरातील कवठा रोड परीसरातील स्मशानभूनित नग्नावस्थेत २० वर्षीय तरुणाचे कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 

वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी स असलम स सरफराज (२०, रा बुखारी तकीया)  या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे गुप्तांग कापलेले असून शरीरावर जखमा दिसून येत होत्या.ही माहीती शहर पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,दिलीप पोले,शेख नय्यर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते. पाहणी केली आधार कार्ड सापडल्याने ओळख पटली. शहर पोलीसांनी घटनास्थळाची पूर्ण पाहणी  करून तपास सुरू आहे.
 

Web Title: Excitement after body found naked in graveyard in hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.