वीजचोरी करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:40+5:302021-07-18T04:21:40+5:30
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे महावितरण कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम १९ एप्रिल रोजी राबविली होती. यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांना चोखाराम ...
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे महावितरण कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम १९ एप्रिल रोजी राबविली होती. यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांना चोखाराम इंगोले, दिलीप मारोती मोरे, उत्तमराव मसाजी जोगदंड, अंबुबाई खंदारे यांनी अनधिकृत वीज वापरून प्रत्येकी १ हजार ८७० रुपये किमतीची चोरी केल्याचे उघड झाले होते, तर शेख जलील शेख खाजा, बशीर कुरेशी, रशीद खॉ हसन खॉ पठाण यांनी प्रत्येकी २ हजार ८०० रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले होते. त्यांना प्रत्येकी वीजचोरीची रक्कम व तडजोड रक्कम २ हजार अशी एकूण रक्कम भरण्याचे सांगितले होते. मात्र, वीजचोरीची रक्कम भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज चोरीप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे.