दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:23 AM2018-07-05T00:23:21+5:302018-07-05T00:23:47+5:30
दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालेली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्यांना एकवेळ समझोता योजनेत दीड लाख भरून खाते बेबाकी करण्यास ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालेली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्यांना एकवेळ समझोता योजनेत दीड लाख भरून खाते बेबाकी करण्यास ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी वन टाईम सेटलमेंटसाठी अर्ज केला असला तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ घेतला नाही. काही शेतकरी आता त्याबद्दल विचारणा करीत आहेत. मात्र यासाठी ३0 जून २0१८ रोजीपर्यंतच मुदत होती. आता शासनाने दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना ३0 सप्टेंबरपर्यंत आपल्या हिश्याची पूर्ण रक्कम भरून या योजनेचा लाभ घेण्याची संधी दिली आहे.
अजूनही जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये अर्ज भरूनही कर्जमाफीचा लाभ न मिळालेले शेतकरी खेटे मारत आहेत. ही संख्या नेमकी किती आहे, याचा अंदाज येत नाही. बँकनिहाय याद्या लावल्यास शेतकºयांचा हा नेमका आकडा लक्षात येणार आहे. मात्र तसे होत नसल्याने सगळाच मोघम कारभार सुरू आहे. कर्जमाफीची रक्कम जमा झाली की नाही, हे तपासून बँक व्यवस्थापक मात्र वैतागत आहेत.