आरटीई प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:52 AM2018-03-01T00:52:43+5:302018-03-01T00:52:46+5:30

शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

 Extension of RTE admission process | आरटीई प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

आरटीई प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेशासंदर्भात यापूर्वी काही शाळांनी अंग काढून घेतले होते. मात्र शिक्षण विभागाने परस्पर अशा सर्व शाळांना या कायद्याखालील प्रवेश प्रक्रियेत आणल्याचा आरोप काही शाळांकडून केला जात होता. शिवाय काही शाळांनी तर न्यायालयात धाव घेत पूर्वीचा परतावा न मिळाल्यास यापुढे आरटीईत प्रवेश प्रक्रियेसाठी सक्ती करू नये, अशी मागणीच केली होती. एकतर ही प्रक्रिया आॅनलाईन असल्याने अनेक गोरगरीब पालकांना ही प्रक्रियाच करणे शक्य होत नाही. त्यातच शासनाकडून परतावा मिळत नसल्याने अनेक मोठ्या शाळा प्रवेश शुल्काची मागणी हमखास करतातच. त्यामुळे मोजक्या शाळांतच आरटीईचा खºया अर्थाने लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. तो सगळीकडेच मिळावा, यासाठी शासन धोरण निश्चित होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ५९ शाळांत आरटीईच्या ६९२ जागा आहेत. यासाठी ८३७ अर्ज आले आहेत. यापूर्वी २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख होती. आता ७ मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ६६६.२३४ीिल्ल३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केंद्र उभारण्यासही सर्व शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे.

Web Title:  Extension of RTE admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.