व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:43+5:302021-06-05T04:22:43+5:30
हिंगोली : कोरोना लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारची असताना ती राज्य सरकारवर ढकलण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत ...
हिंगोली : कोरोना लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारची असताना ती राज्य सरकारवर ढकलण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत असून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले की, देश कोरोना सारख्या महामारीतून जात असताना केंद्र सरकार उपाययोजनेकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोनावर लस प्रभावी उपाय आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकार कासव गतीने लसीकरण मोहीम राबवित असल्याने देश जगात सर्वात मागे पडला आहे. लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारची असताना राज्य सरकारवर ढकलली जात आहे. आता तिसरी लाट येण्याचे संकेत दिले जात आहेत. कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, खा. राहूल गांधी यांनी जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारला सल्ला दिला. परंतु, मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करीत असून कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूस केंद्र सरकारच जबाबदार राहणार असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे देशात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, श्यामराव जगताप, विनायकराव देशमुख, बापूराव बांगर, बाबा नाईक, धनंजय पाटील, भगवान खंदारे, ओमप्रकाश देशमुख, विलास गोरे, बंटी नांगरे, आबेदअली जहागिरदार, अनिल नेणवाणी, माबूद बागवान, मुजीब कुरेशी, विठ्ठल जाधव, जुबेर मामू, अक्षय डाखोरे, राजदत्त देशमुख, संतोष साबळे, नजीर भाई, डॉ. माणिकराव देशमुख, एस.पी. राठोड, विठ्ठलराव मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो :