मुसळधार पावसाने प्रचंड महापूर, किन्होला गावात घुसले पाणी, शेतीचेही प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 07:04 PM2022-07-09T19:04:51+5:302022-07-09T19:05:18+5:30

पहिल्याच पावसाने सर्वत्र हाहाकार

Extreme levels of flood danger were announced in many parts of the country | मुसळधार पावसाने प्रचंड महापूर, किन्होला गावात घुसले पाणी, शेतीचेही प्रचंड नुकसान

मुसळधार पावसाने प्रचंड महापूर, किन्होला गावात घुसले पाणी, शेतीचेही प्रचंड नुकसान

googlenewsNext

कौठा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील कवठा परिसरात दिनांक आठ जुलैच्या रात्रीपासून नऊ जुलैच्या सकाळी पाचपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या परिसरातील नदीसह ओढे नाले यांना आलेल्या प्रचंड महापुराने किनोळा गावात पाणी घुसले असून कवठा किनोळा इत्यादी भागातील शेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे.

कवठा गावाजवळून वाहणारी असणा नदीसमोर किनोळा गावातला भेटते. तसेच किनोळा गावाला कुरुंदा नदी सोमठाणा नाला कुरुंदानाला अशी एकूण दोन नद्या व तीन नाले एकत्र येतात. रात्रीच्या जोरदार पावसाने असणा नदीसह कुरुंदा नदी व नाले ओढे यांना प्रचंड महापूर आल्याने हे सर्व पाणी किनोळा गावात घुसली. सर्वजण झोपेत असताना अचानक आलेल्या महापुराने धांदल उडाली.

गावातील मंदिर जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालयासह अनेक घरात पुराचे पाणी घुसले. यामुळे अनेकांचे संसार उपयोगी साहित्य रस्त्यावर वाहून गेले.  असणा नदी काठावरील नेमकेच पेरणी झालेल्या शेतीचेही मोठे नुकसान झाले असून जमिनी उकरल्या गेल्या. तर उभ्या पिकामध्ये पाणी साचल्याने पिके हातून गेली आहेत.

याचप्रमाणे कवठा कुरुंदा मार्गावरील तोंडपुशी ओढ्यालाही मोठा पूर आल्याने जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. अगोदरच उशिरा झालेली पेरणी आणि आता प्रचंड महापूर यामुळे या परिसरातील शेतकरी पूर्णतःहतबल झाला आहे. सन १९८३ नंतर यावर्षीच महापूर किनोळा गावात आल्याचे ग्रामस्थ पंजाबराव जाधव, मारुतराव जाधव, विठोरे यांनी सांगितले.

Read in English

Web Title: Extreme levels of flood danger were announced in many parts of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.