हिंगोलीत १७९ पैकी ९0 योजनांचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:37 AM2017-12-20T00:37:03+5:302017-12-20T00:37:09+5:30

जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.

To facilitate 90 out of 179 schemes in Hingoli | हिंगोलीत १७९ पैकी ९0 योजनांचा मार्ग सुकर

हिंगोलीत १७९ पैकी ९0 योजनांचा मार्ग सुकर

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षानुवर्षे रखडल्या नळयोजना : जि.प.ने केले नियोजन, पुरेसा निधी नसल्याने प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.
गतवर्षी जवळपास २६0 योजना प्रलंबित होत्या. मात्र त्यावेळी अशीच मोहीम राबविल्यानंतर ४५ योजनांचे कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या बैठका घेवून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही न बधलेल्या समित्याच आता उरल्या आहेत. या अपूर्ण योजनांबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच त्याचे जि.प.ने नियोजन केले आहे. आता जर या समित्या काम पूर्ण करणार नसतील तर गुन्हे दाखल करण्यासह इतरही कारवाई करण्याचे संकेत दिसत आहेत.
कोट्यवधीचा निधी खर्च झाल्यानंतरही योजना प्रलंबित असल्याने अनेक गावांत ग्रामस्थांना पाणीच मिळत नाही. काही ठिकाणी फक्त गावात पाणी आले तर दारात नळ आला नाही. काही ठिकाणी तर हेही झालेले नाही. मात्र आता काही ठिकाणच्या योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण दाखवून या झंझटीतून मुक्त होण्याची घाई पाणीपुरवठा विभागाला झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अशा योजना १२१ असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी ६0 योजना या आर्थिक वर्षाअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यातील प्रलंबित २७ पैकी १0, वसमतला ३५ पैकी १२, कळमनुरीत ३५ पैकी १७, हिंगोलीत ११ पैकी १0, सेनगावात १३ पैकी ११ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण पण आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचे सांगून अंतिम करण्याचे नियोजन आखलेले आहे. ही बाब केवळ कागदोपत्रीच करायची असल्याने याला गतीही येवू शकते. लोकप्रतिनिधींनी याची तपासणी करण्याची गरज आहे. योजना अंतिम करण्याच्या नादात ती अर्धवट राहता कामा नये.
५८ गावे : नुसते पाणी पोहोचले
केवळ गावात पाणीपुरवठा सुरू केलेल्या मात्र अपूर्ण असलेल्या योजना ५८ आहेत. त्यापैकी ३0 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यात ११ पैकी ५, वसमतला ११ पैकी ५, कळमनुरीत १४ पैकी ८, हिंगोलीत ८ पैकी ५, सेनगावात १४ पैकी ७ योजनांचा समावेश आहे. या योजना पूर्ण करण्याचे नियोजन आखले आहे. काही योजनांना पुरेल एवढाच निधी आहे. मात्र त्यावर मात करून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टिनेच नियोजन केल्याचे अतिरिक्त मुकाअ ए.एम.देशमुख यांनी सांगितले.

Web Title: To facilitate 90 out of 179 schemes in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.