कारखान्याला आग; ३५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:10 AM2019-04-05T00:10:01+5:302019-04-05T00:10:28+5:30
माळवटा एमआयडीसी भागातील बायोकॉलचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत कच्चा माल, मशिनरीची वायरींग आदी साहित्य जळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : माळवटा एमआयडीसी भागातील बायोकॉलचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत कच्चा माल, मशिनरीची वायरींग आदी साहित्य जळाले. या आगीत ३५ लाखाचे नुकसान झाल्याचे कारखाना मालकाने ग्रामीण पोलिसांत दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.
नांदेड रोडवरील माळवटा येथील एमआयडीसी भागातील कोल कारखान्यातील भुशाने बुधवारी सायंकाळी पेट घेतला. ही आग वाढत गेली आगीत कारखाना परिसरात साठवलेला बॅगस, भुसा, मशिनरीचे वायरींग, पाईप, कारखान्याचे शेडने पेट घेतला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाने प्रयत्न केले. आगीत साहित्य व शेड जळाले.
रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते. कारखानदार महेंद्र सोळंके यांनी गुरूवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जळीतची नोंद घेण्यात आली आहे. यात ३५ लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.