बनावट मसाला विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:47 PM2018-05-26T23:47:42+5:302018-05-26T23:47:42+5:30
नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणाºया व्यापाºयांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रिजवान महोमद गौस पाशा, वसमत व गोवर्धन लोहाना उर्फ राजू गोळीवाला (रा. नांदेड जुना मोंढा) अशी आरोपींची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणाºया व्यापाºयांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रिजवान महोमद गौस पाशा, वसमत व गोवर्धन लोहाना उर्फ राजू गोळीवाला (रा. नांदेड जुना मोंढा) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील मामाचौकातील एका किराणा दुकानात नामांकित कंपनीच्या नावे बनावट मसाला विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे अशी तक्रार मसाला कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक शिवाजी घुले यांनी पोलिसांत दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत किराणा दुकानात २५ मे रोजी छापा टाकला. यावेळी दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला ६ हजार ९०० रुपये किमतीचा मसाला जप्त केला. ग्राहकांच्या आरोग्यास हानीकारक होईल असे उत्पादन कंपनीच्या मूळ मालकाची कुठलीही परवानगी न घेता बनविले होते. तर हा माल विक्रीच्या उद्देशाने आरोपींनी स्वत:जवळ बाळगल्याने वरील दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांनी दिली. यातील शेख रिजवान यास पोलिसांनी अटक केली असून तपास पोउपनि एस. के. केंद्रे करीत आहेत.