सेनगाव तालुक्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 02:32 PM2018-11-27T14:32:54+5:302018-11-27T14:33:21+5:30
सततची नापिकी तसेच कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे मुलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
गोरेगाव (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी गणेशराव नामदेवराव वडकुते (६२) यांनी शेतातील गोठ्यामध्ये लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.
सततची नापिकी तसेच कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे मुलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यांच्यावर बँकेसह खाजगी सावकाराचेही कर्ज आहे. मयताचा मुलगा विकास वडकुते हे सकाळी दूध काढण्यासाठी शेतात गेले असता त्यांना गणेशराव यांनी शेतातील गोठ्यात टिनपत्राच्या लागडाला गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर मयताचा मुलगा कूबेर वडकुते यांच्या फिर्यादीवरुन गोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.