तूर खरेदी बंदमुळे शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:30 AM2018-04-20T00:30:32+5:302018-04-20T00:30:32+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमच्या तुरीचा खरेदी करा, या मागणीसाठी सेनगाव-रिसोड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमच्या तुरीचा खरेदी करा, या मागणीसाठी सेनगाव-रिसोड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. आमच्या तुरीची मोजणी करुन घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी शेतकºयांनी घेतली. या गोंधळात काही शेतकºयांनी बाजार समिती सचिवास धक्का-बुक्की केली.
शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्र १८ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावर तुर घेऊन आलेल्या ८७ शेतकºयांची दीड हजार क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. सदर शेतकºयांनी मागील पाच दिवसांपासून नाफेड केंद्रावर तूर आणली होती. परंतु केंद्र बंद करण्याच्या निर्णयामुळे या शेतकºयांच्या तुरीचे मोजमाप होऊन शकले नाही. मागील पाच दिवसांपासून तुर घेऊन आलेल्या शेतकºयांनी ‘आमची तूर खरेदी करावी त्यानंतरच खरेदी केंद्र बंद करावे’ अशी आक्रमक भूमिका स्वीकारत गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील रिसोड रस्त्यावरील खरेदी केंद्रावर गोंधळ करत बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांना घेराव घातला व धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळ वाढला व तणाव निर्माण झाला. तसेच आमच्या तुरीचे मोजमाप करा अशी मागणी काही शेतकºयांनी मोबाईलद्वारे थेट सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली. तसेच दुपारच्या सुमारास तहसीलदार वैशाली पाटील यांनी शेतकºयांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पंरतु आमची तूर मोजून घेण्याची लेखी हमी द्या या मागणीवर शेतकरी ठाम होते.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते. शेतकरी कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. यावेळी आंदोलनाला जि. प. चे उपाध्यक्ष यांनी भेट देऊन शेतकºयांचे गाºहाणे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या कानावर घातले. त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारी यांनी ८७ शेतकºयांचे मोजमाप करून घेण्यासाठी शासनाकडे मागणी करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकºयांनी लेखी आश्वासनामुळे आंदोलन स्थगित केले.
तीन दिवसांत तुरीचे मोजमाप न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला. यावेळी आंदोलनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सपोनि बालाजी येवते, गोरेगाव ठाण्याचे पोनि सोनवणे, फौजदार किशोर पोटे यांच्यासह दंगा नियंत्रण पथकही पाचारण
करण्यात आले. अचानक सुरू झालेले आंदोलन तीन तास सुरू होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रस्त्याच्या दोन्ही बांजूंनी १ किमी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ये-जा करणाºयांची एकच धावपळ झाली. यावेळी वाहतूक काही वेळ ठप्प होती.