शेतकऱ्यांनी बनविला स्वखर्चाने रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:13+5:302020-12-22T04:28:13+5:30
शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातून स्वखर्चाने रस्ता बनवून दिल्याने त्या शेतकऱ्याचे या परिसरात सर्व स्तरांतून ...
शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातून स्वखर्चाने रस्ता बनवून दिल्याने त्या शेतकऱ्याचे या परिसरात सर्व स्तरांतून कौतुक होताना दिसत आहे.
शेवाळा परिसरात इसापूर धरणाचा उजवा कालवा गेल्यामुळे या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ऊस नेताना रस्त्याची मोठी अडचण निर्माण होते. कारण, या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतात पाणंद रस्ते आहेत. मात्र, शासनाच्या इशाऱ्याने हे पाणंद रस्ते अनेक ठकाणी नाहीसे झाले. कारण, हे पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी फोडून हे पाणंद रस्ते शेतीला वहितीला आणून काही ठिकाणी गाडीबैल जाण्यापुरतेच ठेवले आहेत. त्यातच पाणंद रस्त्याची डागडुगी नसल्याने माल वाहतुकीसाठी या परिसरातील पाणंद रस्ते नाहीसे झाले आहेत. तर पाणंद रस्त्याची जरी शेतकऱ्यांनी दुरुस्ती करण्याचे ठरविले तरी पाणंदरस्ते आता छोटे झाल्याने शेतकऱ्यांत भांडणतंटे वाढत आहेत. रस्त्याचा प्रश्न शेतकऱ्यांना शेतातील माल नेताना भेडसावत असल्यामुळे गावातील शेतकरी गोपाल रामभाऊ सावंत व बबन कचरू लिंगे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून जाणाऱ्या शेवाळा ते कवडी या पाणंद रस्ता तर सोडा शेतातून जाणारा पाऊलरसता असणारा या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील दोन्ही शेतकऱ्यांनी मिळून अठरा फूट रुंदीचा रस्ता स्वखर्चाने जेसीबीने शेतकऱ्यांचा माल जाण्यासाठी मजबुतीकरण करून दिला. हा रस्ता पावसाळ्यात खराब होऊ नये म्हणून दोन्ही बाजूने नालीचेसुद्धा काम केल्याने या शेतकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
मात्र, या दोन धाडसी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने स्वतच्या शेतातून रस्ता बनवून दिल्याने आता बाजूचे शेतकरीही पुढील रस्ता करण्यासाठी सरसावले असून त्यांनीही पुढील रस्त्याचे काम चालू केेले आहे. त्यामुळे या धाडसी शेतकऱ्यांमुळे रस्त्याचा प्रश्न सुटला आहे.