शेतक-यांनो, आत्महत्या करू नका- इंदोरीकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:36 AM2018-03-14T00:36:53+5:302018-03-14T00:37:40+5:30

शेतीची आता दुरवस्था झाली आहे. मात्र भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांनो खचून आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता धीरोदात्तपणे उभे राहण्याचे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.

 Farmers, do not commit suicide - Indorekar Maharaj | शेतक-यांनो, आत्महत्या करू नका- इंदोरीकर महाराज

शेतक-यांनो, आत्महत्या करू नका- इंदोरीकर महाराज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतीची आता दुरवस्था झाली आहे. मात्र भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांनो खचून आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता धीरोदात्तपणे उभे राहण्याचे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.
जि.प.शाळेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात महाराजांनी शेतकरी, महिला, विद्यार्थी, पालक यांना कसे वागावे, याचा मंत्र दिला. तर आई-वडिलांची सेवा करा, असा सल्ला दिला.
व्यसनाधीनतेवर भाष्य करताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तलवार हाती घेतली. पण आजची पिढी दारूची बाटली हाती घेते, ही शोकांतिका आहे. याला पालकच पूर्णपणे जबाबदार आहे. समाजात काही व्यक्ती असामान्य म्हणून एकदाच जन्माला येतात. ते जनमानसाचा ठाव घेतात, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आदींची उदाहरणे त्यांनी दिली.
यावेळी मंचावर माजी खा. शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, हरिश्चंद्र शिंदे, रविराज माने आदी मान्यवर उपस्थित होते. तर मोठा जनसमुदायही होता.

Web Title:  Farmers, do not commit suicide - Indorekar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.