अभियंत्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:07 AM2018-05-31T01:07:32+5:302018-05-31T01:07:32+5:30

येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या खाजगी निवासस्थानासमोर सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकºयांनी विद्युत जोडणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे.

 Farmers' fasting in front of Engineer's house | अभियंत्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

अभियंत्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या खाजगी निवासस्थानासमोर सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकºयांनी विद्युत जोडणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे.
गारखेडा येथील राजू खिल्लारे हे शेतात विद्युत जोडणी करण्यासाठी तीन वर्षांपासून महावितरणचे उंबरठे झिजवत आहेत. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून गारखेडा येथे दलित समाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लगात आहे. त्यातच विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत जोडणी करुन दिली तरीही जोडणी काही वेळात तोडली जात आहे. ती जोडणी कायमस्वरुपी करण्यासाठी संबंधित गावातील शेतकरी अनेकदा खेटे घेत आहेत. मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. परिणामी, अधिकाºयांच्या घरासमोर उपोषण करावे लागत असल्याचे शेतकरी खिल्लारी यांनी सांगितले. तरीही दखल घेतली नाही तर पोलीस अधीक्षक यांच्या निवास्थानासमोर व नंतर जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केले जाणार असल्याचे उपोषणकर्त्याने सांगितले. महावितरण कंपनीच्या पथकाने उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांना तुमची विद्युत जोडणी वेळीच जोडून दिली जाणार आहे. जोडणीही पोलीस संरक्षणात करावी लागणार आहे.
प्रयत्न सुरु आहेत
४संबंधित शेतकºयांची लाईन जोडून दिली की, काही वेळात तोडली जाते. त्यामुळे आता तो विद्युत पुरवठा पोलीस संरक्षणात जोडून देण्यात येणार आहे. तसे पत्रही पाठविले असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title:  Farmers' fasting in front of Engineer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.