नांदापूर परिसरात शेतकऱ्यांनी केला पेरणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:24+5:302021-06-18T04:21:24+5:30
गतवर्षी कापसावर बोंडअळी पडली होती. त्यामुळे कापसाचा उतारा कमी आला. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा यावेळेस ...
गतवर्षी कापसावर बोंडअळी पडली होती. त्यामुळे कापसाचा उतारा कमी आला. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा यावेळेस कमी केला आहे. दुसरीकडे सोयाबीन हे नगदी पीक आहे. या पिकाचा पैसा हातात लवकर पडतो यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा जास्त घेतला आहे. गत पाच -सहा दिवसांपासून नांदापूसह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. दमदार पाऊस पडत असल्यामुळे सध्यातरी शेतकरी आनंदी दिसत आहे. नांदापूर, सोडेगाव, हारवाडी, जामगव्हान, पिंपऴदरी, आमदरी, राजदरी, कंजारा आदी गावांमध्ये पेरण्या जवऴपास आटोक्यात आल्या आहेत. सोयाबीन पिकाबरोबरच कापूस, हळद, तूर, मूग,उडीद आदी पिकेही शेतकऱ्यानी घेेतली आहे.
- गतवर्षी कापसाचे उत्पन्न घटले
गतवर्षी नांदापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा जास्त घेतला होता. परंतु, अतिवृष्टी व बोंडअळीने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अतिवृष्टीने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यावेळेस बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाडे पाठ फिरवत पेराही कमी केल्याचे दिसून येत आहे. फोटो १२