अन् रिकाम्या हाती परतले शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:51 PM2018-06-11T23:51:05+5:302018-06-11T23:51:05+5:30
तालुक्यातील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात मिळणार म्हणून तालुक्यातील शेकडो शेतकरी कागदपत्रांची पूर्तता रांगेत लागले. मात्रयेथे कार्यरत कर्मचारी जेवणासाठी गेले अन् चक्क सायंकाळीच परत आल्याने शेतकºयांना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात मिळणार म्हणून तालुक्यातील शेकडो शेतकरी कागदपत्रांची पूर्तता रांगेत लागले. मात्रयेथे कार्यरत कर्मचारी जेवणासाठी गेले अन् चक्क सायंकाळीच परत आल्याने शेतकºयांना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली आहे.
येथे घुगे नावाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ते दुपारी १.३० ला कार्यालयात आले व कामाला सुरूवात केली. तर दुपारी ३ वाजता जेवण करण्यासाठी बाहेर पडले ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयात परत आलेच नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी बियाणे नेण्यासाठी आणलेली वाहनेसुद्धा रिकामीच परत न्यावी लागली. सातबारा, आधार कार्ड, येण्याचा खर्च, वाहनांचा खर्च, शेतकºयांच्या माथी पडला. तालुका कृषी अधिकाºयांसह सर्वांचेच भ्रमणध्वनीही बंद होते. त्यातच १३५० रुपयांना मिळणारी बॅग व टोकण देण्यासाठी ५० रुपयांची दक्षिणा लागत होती. त्यातच कृषी अधिकारी व इतर कर्मचारीही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, हा गंभीर प्रश्न असल्याने शेतकºयांनी हे निमूटपणे सहन केले. मात्र नंतर सदर कर्मचारीच गायब झाल्याने शेतकºयांच्या संतापाचा पारा चढल्याने त्यांनी तक्रारीचा मार्ग पत्करला.