शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:26+5:302021-07-22T04:19:26+5:30
हिंगोली : सन २०२१-२२ या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने ...
हिंगोली : सन २०२१-२२ या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.
ड्रॅगन फ्रूट फळाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करावी. फळपिकांची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण याकरिता अनुदान दिल्या जाणार आहे. यासाठी ४ लाख प्रति हेक्टर प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे रक्कम १ लाख ६० हजार प्रति हेक्टर अनुदान तीन वर्षात ६०:२०:२० या प्रमाणात दिले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तिसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत असायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावे. अर्ज करताना काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही लोखंडे यांनी केले आहे.