रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी लागवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:32+5:302021-06-30T04:19:32+5:30
हिंगोली : सन २०२१-२२ मध्ये रेशीम शेती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी लागवड करून घ्यावी, असे आवाहन ...
हिंगोली : सन २०२१-२२ मध्ये रेशीम शेती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी लागवड करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झाला असून, वातावरण रेशीम तुती लागवडीसाठी अनुकूल असे झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी लागवडी केल्यास त्या यशस्वी होऊ शकतात. शासनाच्या धोरणानुसार, १०० टक्के लागवडी या रोपवाटिकेतील रोपांद्वारे करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपांद्वारेच लागवड करून घ्यावी.
लागवडीसंदर्भात कुठलीही तांत्रिक अडचण असल्यास किंवा रोपे मिळण्यास अडचण होत असल्यास, संबंधित शेतकऱ्याने जिल्हा रेशीम विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन करणे सोपे होईल.
शेतकऱ्यांनी त्रुटीची पूर्तता करावी...
ज्या शेतकऱ्यांनी ‘मनरेगा’ योजनेमधून नावनोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्याशिवाय काम सुरू करू नये. प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश प्राप्त होण्यासंदर्भात काही प्रकरणे त्रुटीत निघाले असल्यास, त्या त्रुटींची पूर्तता करावी.
‘मनरेगा’ योजनेतील शेतकऱ्यांनी संबंधित १ एकरमध्ये कुठलेही अंतरपीक घेऊ नये, तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच लागवड करावी, जेणेकरून त्यांना अनुदान मिळण्यासंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.