शेतक-यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:45 PM2017-12-14T23:45:21+5:302017-12-14T23:45:29+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ डिसेंबर रोजी शेतकºयांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन केले. पूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गुरूवारी शेतकरी उपोषणास बसले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ डिसेंबर रोजी शेतकºयांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन केले. पूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गुरूवारी शेतकरी उपोषणास बसले होते.
हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासन दिले होते. निवेदनाद्वारे शेतकºयांच्या उत्पादन मालाला भाव द्या, शेतकºयांना कर्जमुक्त करा. तसेच शेतकºयांच्या मनाप्रमाणे त्याला शेतात पीक पिकवू द्यावे. शेतकºयांना वयाच्या ४५ वर्षांपासून पेन्शन सुरू करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. परंतु याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी गुरूवारी धरणे आंदोलन केले. निवेदनावर सुधाकर घोलप, नीळकंठ इंगळे, विजय पाईकराव, रंजना पाईकराव, लक्ष्मण पतंगे यांच्यासह २२ शेतकºयांच्या स्वाक्षरी आहेत.