वसमत तालुक्यात सततच्या नापीकीला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:42 PM2017-12-12T18:42:29+5:302017-12-12T18:43:13+5:30
वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील शेतक-याने सततच्या नापीकीला कंटाळुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) रात्री उशिराने हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिंगोली : वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथील शेतक-याने सततच्या नापीकीला कंटाळुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) रात्री उशिराने हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील रंगनाथ पंडीतराव चव्हाण वय (४०) हे मागील काही दिवसांपासून सततच्या नापीकीमुळे चिंतेत होते. ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरी कोणी नसल्याने त्यांनी दोरखंडाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी रावसाहेब चव्हाण यांच्या माहितीवरून हट्टा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रंगनाथ चव्हाण यांच्या पच्यात पत्नी, चार मुली व १ मुलगा असा परिवार आहे.