शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन

By विजय पाटील | Published: December 9, 2023 04:51 PM2023-12-09T16:51:33+5:302023-12-09T16:52:30+5:30

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ

Farmers will pay the Shraadh of the state government; Food sacrifice movement is going on for total debt relief | शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन

शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन

हिंगोली: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला असून कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे परंतु शासनाला मात्र शेतकऱ्यांची कीव येत नाही. यासाठी तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अन्नत्याग आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्यामुळे रविवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी बांधव राज्य शासनाचे श्राद्ध घालणार आहेत.

गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर गजानन कावरखे , संजय मुळे , रामेश्वर कावरखे , मदन कावरखे , अक्षय पाटील सुनील मधुरवाड आदी शेतकऱ्यांनी  मागणीसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणी साठी अन्नत्याग आंदोलन ८ डिसेंबर पासून सुरू केले आहे. दरम्यान गोरेगाव सह परिसरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत.

गत चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी तर पाऊस कमी झाला दुसरीकडे विविध रोगांमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला आणि सोयाबीन हातचे गेले. कापूस तुरीचीही तीच अवस्था आज जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाने साथ सोडली असली तरी रब्बी हंगामात शासन शेतकऱ्यांना मदत करेल, शेतमालाला योग्य भाव देईल असे वाटले होते. परंतु, शासन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. शेतकरी सध्या कर्जबाजारी झाला असून बँकेचे कर्ज कसे फेडावे या अभी वंचित आहे. शेतकरी जगला तर देश जगेल असे शासन करते म्हणत असले तरी शेतकऱ्यांना शासनाचा कवडीचाही आधार राहिला नाही उलट आंदोलन करत्या शेतकऱ्यांवर शासन गुन्हे दाखल करत आहे. एवढेच काय आंदोलन करू नका, असेही सांगत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे मागच्या दोन आठवड्यांपूर्वी गोरेगाव व परिसरातील सात ते आठ शेतकरी अवयव विक्रीसाठी मुंबई येथे गेले होते परंतु शासनाने मुंबई येथे गेलेल्या शेतकऱ्यांवर दडपशाही करत त्यांचे आंदोलन मोडीत काढले यापुढे जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा यावेळी शासनकर्त्यांनी दिला पोलीस बाळाचा वापर वारंवार हे सरकार करत आहे अशावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही. आत्महत्या रोखायचे असतील तर शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून महाराष्ट्र कर्जमुक्त करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे.

रविवारी घातली जाणार शासनाचे श्राद्ध...
महाराष्ट्र तील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी आठ डिसेंबर पासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. दहा डिसेंबर रोजी अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शासनाने या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला नाही तर सकाळी ११ वाजता शासनाचे येतोचितपणे श्राद्ध घालण्यात येणार आहे.
- गजानन कावरखे, गोरेगाव

Web Title: Farmers will pay the Shraadh of the state government; Food sacrifice movement is going on for total debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.