औंढा नागनाथ येथे ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 07:38 PM2018-03-15T19:38:29+5:302018-03-15T19:39:19+5:30
शेतातील धान्य काढणे बाकी असल्याने वातावरणात झालेला बदल व पावसाची शक्यता यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
औंढा नागनाथ (हिंगोली) : तालुक्यात आज दिवसभरापासून वातावरणात बदल होत जाऊन संपूर्ण वातावरण ढगाळ होते. शेतातील धान्य काढणे बाकी असल्याने वातावरणात झालेला बदल व पावसाची शक्यता यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर गहु पेरणी केली आहे. यातच निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांचे गहू काढणी बाकी आहे. यातच आज अचानक वातावरणात बदल झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते तसेच पावसाने काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. हवामान खात्यानेही येत्या काळात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी शिवाजी शेळके यांनी केले आहे.