मुख्यमंत्र्यांच्या फोटोला राख्या बांधून उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:18 PM2018-08-30T23:18:14+5:302018-08-30T23:18:32+5:30
कळमनुरी तालुक्यातील वसपांगरा येथील महिला व ग्रामस्थांनी ३० आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या फोेटोला राखी बांधून आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. वस पांगरा येथील दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या नागरिकांना नमुना नंबर ८ मध्ये समाविष्ट करून शासनाच्या विविध सवलतीचा लाभ द्यावा, ही प्रमुख मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वसपांगरा येथील महिला व ग्रामस्थांनी ३० आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या फोेटोला राखी बांधून आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
वस पांगरा येथील दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या नागरिकांना नमुना नंबर ८ मध्ये समाविष्ट करून शासनाच्या विविध सवलतीचा लाभ द्यावा, ही प्रमुख मागणी आहे.
वस पांगरा येथील ग्रामस्थांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ दिला जात नाही. ग्रामपंचायत सेलसुरा येथील पदाधिकारीही वस पांगरा गावाचे नाव नमुना नंबर ८ वर नोंदवून घेत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे गावच ओस पडण्याच्या मार्गावर आहे. तर गावाचे भीमराववाडी नामकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. निवेदनावर फ्रान्सीस डी. स्वामी, अनिता फ्रान्सीस स्वामी यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.