कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:52+5:302021-05-18T04:30:52+5:30
ऊन वाढले तरीही... चार ते पाच दिवसांपूर्वी उन्हाचा पारा ४१ अंशांपर्यंत गेला होता, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३८ ...
ऊन वाढले तरीही...
चार ते पाच दिवसांपूर्वी उन्हाचा पारा ४१ अंशांपर्यंत गेला होता, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३८ ते ४१ च्या दरम्यान होते. ऊन वाढले असले तरीही त्या प्रमाणात वाढले नाही. त्यामुळे आतापर्यंत तरी यंदाचा उन्हाळा हायसा गेला आहे. अजूनही उन्हाळ्याचा काहीकाळ उरला असून, उर्वरित काळात तापमान वाढीची शक्यता आहे.
यंदाचाही उन्हाळा घरातच
गेल्या वर्षी कोरोनाच्या भीतीने वारंवार लागणाऱ्या संचारबंदीमुळे नागरिकांना अर्ध्यापेक्षा जास्त उन्हाळा घरातच काढावा लागला होता. त्यातच कडक संचारबंदीमुळे तर घराबाहेर पडणेही अवघड होते. यंदाही तेच चित्र आहे. केवळ हालचालीवर ते कडक निर्बंध हटले आहेत. तरीही बाजारपेठ बंदच राहात असल्याने व्यापारी व सामान्यांना घरातच उन्हाळा काढावा लागत आहे. शेतकरी मात्र दरवर्षीप्रमाणे ऊन झेलत शेतीची कामे करताना दिसत आहे. त्यांनीही दुपारी घरातच वेळ घालवण्यास पसंती दिल्याचे दिसते.
तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी
२०१९ ४
२०२० ०
२०२१ ०
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना तेवढे घराबाहेर पडावे लागत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघाताचे बळी जाण्याचे प्रकारच बंद झाले आहेत. अजूनही उन्हाळ्याचा काळ शिल्लक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हापासून बचाव करून घरातच राहिले पाहिजे.
डॉ. गणेश जाेगदंड, साथरोग नियंत्रण अधिकारी