ठाण्यातील जनावरांसाठी चारा- पाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:58 AM2018-03-30T00:58:15+5:302018-03-30T00:58:15+5:30
कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. मात्र अद्याप या जनावरांना गोशाळेत कोणी घेऊन जाण्यासाठी कोणीच तयार झालेले नसल्याने जनावरांना चारा-पाणी घालण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवरच येऊन ठेपली आहे. याची माहिती माहेश्वरी महिला मंडळाला समजताच त्यांनी एका दिवसाच्या हिरव्या चाºयाची जबाबदारी उचलली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. मात्र अद्याप या जनावरांना गोशाळेत कोणी घेऊन जाण्यासाठी कोणीच तयार झालेले नसल्याने जनावरांना चारा-पाणी घालण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवरच येऊन ठेपली आहे. याची माहिती माहेश्वरी महिला मंडळाला समजताच त्यांनी एका दिवसाच्या हिरव्या चाºयाची जबाबदारी उचलली.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सुमन भंसाळी, निर्मला हेडा, सुजाता इंदाणी, राजश्री मुंदडा, प्रेमा बियाणी, गीता लाहोटी, शोभा काबरा, शारदा मुंदडा, तारा मुंदडा, छाया मुंदडा, शीतल तापडिया, ज्योती चांडक, सरिता काबरा, कीर्ती काबरा तर पोलीस ठाण्यातील ज्ञानोबा मुलगीर, शेख शकिल आदींची उपस्थिती होती.