शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जुन्या दरानेच खत विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:41+5:302021-05-25T04:33:41+5:30

- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट काही प्रमाणात थांबली - कृषी विभागाने काळा बाजार रोखण्यासाठी नेमली पथके हिंगाेली ...

Fertilizer sale at old rate after complaint of farmers | शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जुन्या दरानेच खत विक्री

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जुन्या दरानेच खत विक्री

Next

- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट काही प्रमाणात थांबली

- कृषी विभागाने काळा बाजार रोखण्यासाठी नेमली पथके

हिंगाेली : रासायनिक खत कंपन्यांनी दरवाढ केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. काही खतांची नवीन दराने विक्री झाल्यानंतर खत कंपन्या व कृषी विभागाने खताचे सुधारित (कमी झालेले) दरपत्रक लागू केले आहे. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकाऱ्यांनी शहरातील विविध खत विक्री केंद्रांना भेटी देत विक्रेत्यांना सूचना केल्या. त्यानंतर खताची सुधारित दराने (कमी झालेल्या) विक्री सुरू झाली. मात्र सोमवारी अनेक कृषी केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता.

खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांची बी-बियाणे, खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली. त्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू असतानाच खत कंपन्यांनी खताच्या किमती वाढविल्या होत्या. तशा खताच्या गाेण्यांवर किमतीही छापल्या होत्या. अगोदरच कोरोनामुळे शेतकरी त्रस्त असताना ऐन खरिपाच्या तोंडावर खताच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांतून असंतोष निर्माण झाला होता. खताच्या किमती वाढल्याने व्यापाऱ्यांनीही खताची मागणी थांबविली होती. शासनाने अनुदानात वाढ केल्यानंतर जुन्या दराने (कमी झालेल्या) शेतकऱ्यांना खत विक्री करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी नवीन दराने खत खरेदी केले. तसेच खत कंपन्यांनी सुधारित (कमी झालेले) दरपत्रक जाहीर केले. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी खत विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करीत विक्रेत्यांना सूचना केल्या. त्यामुळे जुन्या दराने (दर कमी झालेल्या) खत विक्री सुरू झाली आहे. रविवारी व सोमवारी हिंगोली शहरातील बहुतांश खत विक्री दुकानावर शुकशुकाट दिसून आला.

...तर कायदेशीर कारवाई- कानवडे

शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे सुधारित (दर कमी झालेल्या) दरानेच विक्री करण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. खताच्या गाेण्यांवर जादा छापील किमत असली तरी शेतकऱ्यांनी सुद्धा शासनाने निर्देश दिलेल्या दरानेच (कमी झालेल्या) खत खरेदी करावे. जादा दराने खत विक्री होत असल्यास अशा विक्रेत्यांची तक्रार तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी कार्यालयात द्यावी. चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी सांगितले.

खताची कृत्रिम टंचाई

जिल्ह्यात बहुतांश दुकानावर डीएपी खत शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली शहरात रविवारी काही दुकानांवर विचारणा केली असता डीएपी, १०.२६.२६ , १२.३२.१६ खत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया...

खतांच्या अनुदानात वाढ केल्याने आता जुन्या दराने खत मिळणे अपेक्षित आहे. मात्र अनेक व्यापारी डीएपी सारखे खत उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. यात कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्यावे.

- डी.एम. माखणे, शेतकरी

विविध खत कंपन्यांचे खतांचे दरपत्रक विक्रेत्यांना उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोणताही खत विक्रेता जादा दराने खत विक्री करणार नाही. शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होणार नाही.

- आनंद निलावार, जिल्हाध्यक्ष फर्टिलायझर, असो.

विविध कंपनीचे

जुने दर प्रकार नवीन दर

१२००-१३२५ डीएपी १५००-१९००

११८५-१२३५ एनपीके १२.३२.१६ १६००-१८००

११७५-१३३० एनपीके १०.२६.२६ १५५०-१७७५

९५०-१३०५ २०.२०.०.१३ ११५०-१६००

१२८५ एनपीके १९.१९.१९ १७००

१२८०-१३५० २४.२४.० १५५०

१०७५-११०० एनपीके १६. १६.१६ ११२५-१४००

८७५ एमओपी १०००

१२७५ १४.३५.१४ १७२५

सध्याचे दर

डीएपी - १२००

एमओपी - १०००

२४.२४.०० - १४५०

२४.२४.००.०८ -१५००

२०.२०.००.१३- ९७५-११५०

१०.२६.२६.०० -११७५-१३९०

१२.३२.१६ -११८५-१३७०

फोटो :

Web Title: Fertilizer sale at old rate after complaint of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.