आजम कॉलनीत दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:31+5:302021-07-22T04:19:31+5:30
शेख नदीम शेख रशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मस्तानशाहनगर येथील मेराज मशिदीच्यामागे बाबूभाई यांच्या घरासमोर गाडी लावण्यावरून वाद झाला. यात ...
शेख नदीम शेख रशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मस्तानशाहनगर येथील मेराज मशिदीच्यामागे बाबूभाई यांच्या घरासमोर गाडी लावण्यावरून वाद झाला. यात त्यांना इसा खाँ पठाण, आमीर खाँ ईसा खाँ पठाण, इम्रान खाँ ईसाखाँ पठाण या तिघांनी पंचने तोंडावर मारहाण करून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच २० रोजी रात्री त्यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
दुसऱ्या गटाचे अहेमद खाँ ईसा खाँ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मला माझ्या आई-वडिलांना गाडीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने शेख नदीम शेख रशीद, नसीर टेलर, बबलू खाँ अफजल खाँ, शेख वसीम शेख रशीद या चौघांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ केल्याचेही शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.